७ जन्माच नातं नियतीने तोडल ; नवविवाहितेचा अपघाती मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज| ४ जून २०२३ | लग्नात नाविवाहित झोडपे सहभागी झाले. लग्न आटोपून घरी जात असतांना ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने साडेपाच महिन्यांपूर्वीच लग्न झालेली नवविवाहिता ठार झाली.तर पतीसह जखमी झाला. यावेळी अजून एक जण जखमी झाला.
आश्विनी अनिकेत कादगे (वय २२, रुईधानोरा, ता. गेवराई) असे मृत नवविवाहितेचे, तर अनिकेत हनुमंत कादगे (वय २८, रुईधानोरा ), प्रमोद नामदेव घाटे असे जखमींची नावे आहेत.
देऊळगावराजा येथील १ जून रोजीच लग्न आटोपून २ जून रोजी सकाळी दुचाकीने पती- पत्नी व मावस दीर घरी रुईधानोरा येथे जात होते. धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री ਟੀ पॉइंटजवळील उड्डाणपुलाजवळ २ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या ट्रेलर (जीजे ३६ एक्स ३३३३) याने दुचाकीला धडक दिली. या धडकेत पत्नी ठार तर पती व मावस दीर हे दोघे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वडीगोद्री येथील गावाकऱ्यांनी धाव घेत मदत केली. धडक देऊन पळून जाणाऱ्या ट्रकला पकडून चालकाला पोलिसाच्या ताब्यात दिले. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मृत अश्विनी कादगे यांचे शवविच्छेदन केले.