⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

तळीरामांची बातच निराळी ! जिल्हात एका महिन्यात रिचवली ७ लाख लिटर बिअर

जळगाव लाईव्ह न्यूज | १३ मे २०२२ | गेल्या महिनाभरापासून जळगाव जिल्ह्यावर उन्हाचा प्रभाव पाहायला मिळत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारचे पेय पिण्यासाठी पसंत करतात. कोणी लिंबू सरबत, कोकम सरबत, कोणी उसाचा रस तर कोणी अजून काही पीत. त्यातच जळगाव जिल्ह्यातील तळीरामांनी गेल्या एका महिन्यात सात लाख लिटर बिअर रिचवली आहे. गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत यात तब्बल १३८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मध्य विकृतीमध्ये 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मद्यपींनी गेल्या एका महिन्यात सात लाख लिटर बिअर रिचवली. तर १ लाख ७ हजार लिटर देशी दारू रिचवली.याच बरोबर ४ लाख 40 हजार लिटर विदेशी दारू देखील मद्यपींनी रिचवली.

शासनाची तिजोरी भरली
एप्रिल महिन्यात तापमानात पारा प्रचंड होता. अशावेळी तापमानाची दाहकता कमी करण्यासाठी तळीरामांनी बियरला चांगलीच पसंती दिली. या दिवसात अतिशय थंड पेय प्यायल्याने उष्णता कमी होते असा काहींचा गैरसमज आहे. मात्र यामुळेच शासनाच्या तिजोरीत चांगलीच भर पडली आहे