वाचा.. उद्यापासून जळगाव जिल्ह्यात काय-काय किती वाजेपर्यंत असणार सुरू
मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यसरकार ५ टप्प्यात अनलॉक करणार आहे. राज्याच्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश पारित केले असून त्यात त्यांनी काही निर्बंध घालून दिले आहेत. दुकाने सकाळपासून रात्री ९ पर्यंत खुली असणार असून त्यातही एका वेळी ५ पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिला जाणार नाही. लग्न सोहळे आणि विविध कार्यक्रमांसाठी मर्यादित उपस्थितीचे बंधन घालून देण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा पुरविणारे दुकाने / आस्थापना : रात्री 09.00 पर्यंत
अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारचे दुकाने / आस्थापना (Non- Essential) : रात्री 09.00 पर्यंत
सर्व Essential व Non-Essential प्रकारच्या दुकानांच्या प्रवेशाच्या ठिकाणी /काउंटर समोर एका वेळी 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश राहणार नाही. तसेच दुकान मालक / चालक यांनी दुकानांच्या दर्शनी भागात बैंक काउंटर प्रमाणे काय/ प्लास्टीकचे पारदर्शक शीट किंवा कमी खर्चात करावयाचे असल्यास पारदर्शक प्लास्टीक पड़दा यांचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच सदर पडद्यातून केवळ ग्राहकास वस्तूंची देवाण-घेवाण करता येईल एवढीच मोकळी जागा ठेवण्यात यावी व दुकानाच्या आतील काऊंटरमध्ये Face Shield चा वापर करणे बंधनकारक राहील.
लग्न समारंभ, अंत्यविधी ५० लोकांची उपस्थिती
जळगाव जिल्ह्यात सोमवार पासून माॅल्स, थिएटर, जीम, सलून, स्पा, हाॅटेल, रेस्टॉरंट, बार रात्री 9 वाजेपर्यंत 50% क्षमतेने सुरू होणार.
सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रम 2 तासाच्या आत 100 लोकांच्या उपस्थितीत पार पाडता येतील. लग्न समारंभ, अंत्यविधीचे कार्यक्रम एकावेळी 50 लोकांच्या उपस्थितीत करता येतील.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आदेश.