---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

दुचाकी वापारणाऱ्यांनो सावधान; जळगावात एकाच दिवशी ७ दुचाकी चोरीला

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १ नोव्हेंबर २०२३ | जळगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणे, मध्यवर्ती मार्केट आणि घराबाहेरून मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. जळगाव शहरात तर दुचाकी चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. शहरातून एकाच दिवशी ७ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. शिवाजीनगर हुडको, जैन मंदिर, सरदार पटेल सभागृह, काळेनगर, मानराज पार्क, मुगल गार्डन आणि टेरेसा शाळेमागील मेहरुण ट्रॅक अशा ७ ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

bike stolen jpg webp

शिवाजीनगर हुडकोत रितेश प्रमोद महाजन (वय २३, रा.गेंदालाल मिल) या तरुणाची स्प्लेंडर प्लस (एमएच १९ डी ९३२१) रविवारी (ता.२९) दुपारी तीनला वाजता चोरीला गेली. मेहरुणच्या अशोक किराणाजवळील संजय बाबुलाल नेवे (वय ५८) यांची टीव्हीएस स्टार प्लस दुचाकी (एमएच १९ डीडी ६७९०) शुक्रवारी (ता.२८) जैन मंदिराबाहेरून चोरीला गेली.

---Advertisement---

कोल्हेनगरातील दिनेश किशोर वाणी (वय ३७) यांची दुचाकी (एमएच १९ बीआर १४०१) सरदार वल्लभ भाई पटेल सभागृहाबाहेरून शनिवारी (ता.२९) रात्री साडेआठच्या सुमारास चोरीला गेली. शिवाजीनगरातील धनाजी काळेनगर भागातून रिक्षाचालक राजू गणपत मोरे (वय ४०) यांची स्प्लेंडर (एमएच १९ ईडी ९८४७) सोमवारी (ता.३०) सकाळी सातला चोरीला गेली.

मानराज पार्क आरएल रुग्णालयाबाहेरून वादक जयेश प्रमोद विसपुते (वय ३१, रा.स्टेट बँक कॉलनी) यांची हिरो पॅशन-प्रो (एमएच १९ बीआर ०२५७) ही सोमवारी (ता.३०) रात्री साडेआठ सुमारास चोरट्यांनी नेली. शहरातील खत फॅक्टरी परिसरातील मुगल गार्डन येथील मोहम्मद नूर मोहम्मद इद्रिस (वय ३०) यांची एफ-डिलक्स (एचएच १९ डीएन ५९४४) ही दुचाकी घराबाहेर उभी असताना सोमवारी (ता.३०) रात्री साडेदहाच्या सुमारास चोरीला गेली. शहरातील सेंट टेरेसा शाळेमागील मेहरुण ट्रॅक जवळून सोमवारी (ता.३०) पॅशन-प्रो(एमएच १९ बीपी ११३३) ही दुचाकी चोरट्यांनी लंपास केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---