जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२४ । जळगाव जिल्हा पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या ६६ पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रेड पीएसआय म्हणून पदोन्नती देण्यात आली असून याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी काढले आहेत.
जिल्हा पोलिस दलात ३० वर्ष सेवा बजाविलेल्या तसेच सहाय्यक पोलिस न उपनिरीक्षक पदावर किमान तीन वर्ष सेवा झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्तीस असलेल्या ६६ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी काढले आहेत.
एसीबीमध्येही आता फौजदार
जिल्हा पोलीस दलातील ६६ सहाय्यक फौजदार यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील व सुरेश पाटील यांचाही पदोन्नती झालेल्यामध्ये समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक हे पद आतापर्यंत नव्हते मात्र या पद्धतीने तेथे दोन उपनिरीक्षक राहणार आहे.