⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | रुग्ण सेवेतून मिळते आत्मिक समाधान; पालकमंत्री गुलाबराव पाटील

रुग्ण सेवेतून मिळते आत्मिक समाधान; पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पनवेल येथे डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी लक्झरी बसने ६० रुग्ण रवाना

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२४ । रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” मानून समाजातील गरजू रुग्णांना आणि डोळ्यांच्या संपूर्णपणे मोफत ऑपरेशनसाठी नेहमी आपण प्राधन्य दिले असून त्यासाठी नेहमीच मदतीचा हात दिला जातो. सर्वसामान्याच्या सेवेसाठी यापुढेही खंबीरपाने उभा राहणार असून रुग्ण सेवेतून आत्मिक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधी येथे बोलत होते.

पाळधी येथे सुगोकी लोन येथे पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा हॉस्पिटलचे डॉ. चंदन चौधरी, डॉ. प्रकश पाटील व डॉ. राहुल चौधरी यांच्या टीमने सुमारे २०० रुग्णांची तपासणी केली. त्यात ६० रुग्ण हे डोळ्यांचे मोठे ऑपरेशन करण्यासाठी पात्र ठरविण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन GPS ग्रुप व भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन मार्फत करण्यात आले.

त्यानुसार आज अशाच ६० गरजू रुग्णांना मोफत आधुनिक पद्धतीने डोळ्यांचे ऑपरेशन करण्यासाठी मुंबई – पनवेल येथील नामांकित असलेल्या आर झुनझुनवाला शंकरा हॉस्पिटल येथे पाळधीहून एका लक्झारीतून ६० पात्र रुग्णांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. पनवेल येथे उद्या या गरजू व पात्र रुग्णांचे ऑपरेशन होणार असून त्यांची राहण्याची व इतर व्यवस्था पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने GPS ग्रुप व व भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन व माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांच्या मार्फत करण्यात आली आहे

कार्याक्रमचे प्रास्ताविकात जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी GPS गुप व भाऊसो गुलाबरावजी पाटील फौंडेशन मार्फत सुरु असलेल्या उपक्रमा बाबत सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन करून आभार माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी मानले. यावेळी माजी महापौर ललित कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उपसरपंच नवल पारधी, कैलास पाटील, चंदन कळमकर, संजय महाजन, धनराजशेठ कासट, प्रशांत झवर, अनिल माळी, दिलीप माळी, आबा माळी, अमोल पाटील, डॉ. चंदन चौधरी, डॉ. प्रकश पाटील व डॉ. राहुल चौधरी यांच्यासह रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.