जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२५ । मध्य रेल्वेने छटपूजा, दिवाळीसाठी विविध ठिकाणांवरून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबई गोरखपूर, पुणे गोरखपूर, एलटीटी, नागपूर, दानापूर विशेष गाड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या गाड्या भुसावळ आणि जळगाव स्थानकांवर थांबणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना लाभ होईल.

मुंबई – गोरखपूर
०१०७९ मुंबई – गोरखपूर गाडी २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दररोज १०.३० वाजता मुंबईतून सुटेल. ती तिसऱ्या दिवशी १० वाजता गोरखपूरला पोहोचेल. ०१०८० गोरखपूर – मुंबई गाडी २८ सप्टेंबर ते २ डिसेंबरपर्यंत धावेल. गोरखपूर येथून दररोज २.३० वाजता सुटणारी गाडी तिसऱ्या दिवशी रात्री १२.४० वाजता मुंबईला पोहोचेल. दोन्ही बाजूच्या मिळून १३२ फेऱ्या होतील.
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.

पुणे – गोरखपूर
०१४१५ पुणे – गोरखपूर गाडी २७ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दररोज ६.५० वाजता पुणे येथून सुटेल. गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी ४ वाजता पोहोचेल. ०१४१६ गोरखपूर -पुणे गाडी २८ सप्टेंबर ते १ डिसेंबरपर्यंत दररोज सायंकाळी ५.३०ला गोरखपूर येथून सुटेल. पुणे येथे तिसऱ्या दिवशी ३.१५ वाजता पोहोचेल. दोन्ही बाजूच्या मिळून एकूण १३० फेऱ्या होतील.
थांबे : दौंड चोर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती.
नागपूर पुणे साप्ताहिक
नागपूर पुणे साप्ताहिक ०१२०९ विशेष गाडी २७सप्टेंबर २९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून ७.४० वाजता सुटेल. पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. ०१२१०गाडी २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक रविवारी पुणे येथून ३.५० वाजता सुटून नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ६.३० वाजता पोहोचेल. २० फेऱ्या होतील. मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा थांबा आहे. यामुळे प्रवाशांची सोय होईल.
थांबे : उरुळी, दौंड मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
एलटीटी-दानापूर विशेष
एलटीटी दानापूर विशेष गाडी (क्र. ०११४३) २५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दररोज १०.३० वाजता एलटीटी येथून सुटेल. ही गाडी दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ७.४५ वाजता पोहोचेल. ०११४४ गाडी २६ सप्टेंबर ते १ डिसेंबरपर्यंत दररोज दानापूर येथून ९.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी एलटीटीला ४.५० वाजता पोहोचेल. एकूण १३४ फेऱ्या होतील.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
पुणे – दानापूर – पुणे विशेष :
०२४४९ क्रमांकाची गाडी २५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत दररोज पुणे येथून दुपारी ३.३० वाजता सुटेल. दानापूर येथे तिसऱ्या दिवशी रात्री २ वाजता पोहोचेल. ०१४५० गाडी २७ सप्टेंबर ते २ डिसेंबरपर्यंत दररोज दानापूर येथून ५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. १३४ फेऱ्या होतील.
थांबे : दौंड चोर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
एलटीटी – नागपूर विशेष गाडी :
०२१३९ एलटटीटी ते नागपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक गुरुवारी एलटीटी येथून रात्री १२.२५ वाजता सुटेल. नागपूर येथे दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. ०२१४० साप्ताहिक सुपरफास्ट २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी नागपूर येथून दुपारी १.३० वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता पोहोचेल. एकूण २० फेऱ्या होतील.
थांबे : ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.








