जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । एरंडोल येथील बस आगारातील ६ कर्मचारी परत कर्तव्यावर रुजू झाले. असून, त्यात ४ वाहक १ चालक व १ मेकॅनिक यांचा समावेश असल्याची माहीती आगार व्यवस्थापक विजय पाटील यांनी दिली. संपात अजूनही या आगारातील २६३ कर्मचारी सहभागी आहेत.
७ नोव्हेंबरपासून सूरू झालेल्या राज्यव्यापी संपामुळे एरंडोल बस आगाराला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या संपामुळे एरंडोल बस आगाराचे सुमारे अडीच कोटींचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. संपात असलेले कर्मचारी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या तंबूतच त्यांच्या प्रश्नावर ठाण आहेत. तर सर्व बस गाड्या आगाराच्या आवारात दिड महीन्यांपासून उभ्या आहे.या संपामुळे ऑटो रिक्षा, काली पिली गाड्या ही खाजगी वाहतूक जोरात आहे.
हे देखील वाचा :
- जळगाव जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन; तारीख आणि ठिकाण जाणून घ्या..
- पत्नीच्या संशयावरुन राग, पित्याकडून दोन मुलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या
- महाराष्ट्रात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका; जळगावमध्ये कसं असेल हवामान?
- खुशखबर ! जळगावात सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचा भाव घसरला..
- Bhusawal : पर्यायी ट्रान्सफॉर्मरने श्रीनगर मधील वीज पुरवठा सुरळीत करा; प्रा. धिरज पाटील