⁠ 
बुधवार, मे 1, 2024

महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू : ६ जणांना १५ पर्यंत कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२१ । भडगाव येथील महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाणीनंतर एका कर्मचाऱ्याचा धक्काबुक्कीत मृत्यू झाला होता. यात दाखल गुन्ह्यात फरार झालेले सात पैकी सहा आरोपींना भडगाव पोलिसांनी पकडून आज भडगाव न्यायालयात हजर केले असता सहा जणांना दि.१५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
दि ७ रोजी भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विजमंडळाच्या शहर व ग्रामीण कार्यालयांवर शिवसेना पक्षाच्या वतीने वीजबिल संदर्भात सकाळी ११ ते ११:३० वाजता ताला ठोक आंदोलन केले. या आंदोलनानंतर दुपारी १२-४५ वाजता भडगाव ते चाळीसगाव रोड वरील विद्युत महावितरण कार्यालयात व आवारात अज्ञात ७ इसमानी प्रवेश करून उपकार्यकारी अधिकारी अजय धमोरे (वय-४३) रा वृंदावन पार्क पाचोरा यांना जीवे मारणाच्या उद्देशाने त्यांच्या कॅबिने मध्ये प्रवेश करून कॅबिन मध्ये प्रवेश करून कम्प्युटर यूपीएस, टेबलावरील काच व कॅबिनच्या काचा फोडून अंदाजे ५० ते ६० हजारांपर्यंत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण, शिविगाळ, दमदाटी केली. 

यावेळी कार्यालयात हजर असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे हे अजय धामोरे यांना भांडण सोडविणेसाठी गेले असता त्या अज्ञात ७ इसमांनी गजानन राणे यांना देखील धक्काबुक्की केली. 

यात गजानन राणे हे खाली पडून मयत झल्याने मारहाण करण्यास आलेले ७ इसम वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणेंच्या मरणास कारणीभूत झाले . व उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे  यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून अजय अशोक धामोरे (वय ४३), राहणार पाचोरा यांच्या फिर्यादीहून ७ इसमांविरुद्ध गु.र.न/१३३/२०२१ भादवी कलम ३०७, ३०४, ३५३,३३२, १४३, १४७, १४८, १४९, २९४, ३२३, ५०४, ५०६, ४२७ सह सार्वजनिक मालमत्ता हानी अधिनियम १९८४ चे कलम ३ प्रमाणे दि ७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर  पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे,पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, प्रल्हाद शिंदे , नितीन राउते, स्वप्नील चव्हाण, पोलीस कॉनस्टेबल ईश्वर पाटील यांनी कारवाई केली.

संशयित आरोपींचे नाव?

१) जितेंद्र विश्वासराव पेंढारकर (वय-३१) रा. रामदास ठाकरे नगर पुनगाव रोड पाचोरा, २) अनिल बारकू पाटील वय-३१ रा. राजीवगांधी कॉलनी पाचोरा, ३) संदीप रामदास पाटील (वय ३१ ) रा. जामनेर रोड पाचोरा, ४) सुनीत रवींद्र सावन्त (वय-३०) रा देशमुखवाडी पाचोरा , ५) चरणसिंग प्रेमसिंग पाटील (वय-३५) रा वडगाव सतीचे ता. भडगाव, ६) गणेश सुदाम चौधरी (वय २३) रा. श्रीराम चौक पाचोरा यांना आज दि १२ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली . यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. 

अटक झालेल्या आरोपींना दुपारी भडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी रिमांड मिळनेस हजर केले असता न्यायालयाने या ६ आरोपींना दि.१५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक रावजी उतेकर करत आहेत.