⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | गुन्हे | खळबळजनक! जळगावात आठ दिवसात आढळले 50 मृतदेह

खळबळजनक! जळगावात आठ दिवसात आढळले 50 मृतदेह

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२४ । गेल्या काही दिवसात जळगाव जिल्ह्यात तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून पारा ४५ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. यामुळे तीव्र उष्णता जाणवत असून दिवसा घरात बसणे देखील आता कठीण झाले आहे. अशा या परिस्थितीत दुपारच्या उन्हात बाहेर फिरणाऱ्यांना उष्माघाताचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसपासून जळगाव जिल्ह्यात विविध कारणांनी मयत झालेले ५० मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

५० पैकी १६ मृतदेह हे बेवारस स्थितीत आढळल्याने खडबड उडाली आहे.या सगळ्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून विविध आजारांनी ग्रस्त असलेली आणि प्रतिकार क्षमता कमी झाल्याने त्यात उन्हाच्या तीव्रतेने हे मृत पावली असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

या सगळ्या मृतदेहावर मंत्री गिरीश महाजन यांच्या जीएम फाऊंडेशन यांच्या मध्यामतून अंत्यासंस्कार केले जाणार आहेत. त्याच बरोबर रस्त्यावर असलेल्या बेवारस नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याच सांगण्यात येत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.