जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यासाठी पुन्हा एकदा माजी मंत्री एकनाथराव खडसे व ऍड रोहीणी खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे अंतर्गत विविध विकासकामांसाठी ५ कोटी रु निधी मंजुर करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे काकोडा येथील मुस्लिम कब्रस्तानसाठी सरंक्षण भिंत बांधकाम करणे व पारंबी येथील रस्ता काॅक्रिटीकरण करणे यासाठी १२ लक्ष रुपये मंजुर, पारंबी येथील रस्ता काॅक्रिटीकरण करणे ८ लक्ष रुपये मंजूर, हिवरा येथील रस्ता काॅक्रिटीकरण करणे यासाठी ६ लक्ष रुपये मंजूर,चारठाणा येथील रस्ता काॅक्रिटीकरण करणे यासाठी १० लक्ष रुपये मंजूर,मोरझिरा येथील सभामंडप बांधकामासाठी १५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती मिळाली आहे.
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज