⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | या 5 बँकांनी मोडला विक्रम, ग्राहकांना FD वर देताय सर्वाधिक व्याज

या 5 बँकांनी मोडला विक्रम, ग्राहकांना FD वर देताय सर्वाधिक व्याज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । रिझर्व्ह बँकेने मे महिन्यापासून रेपो दरात 190 बेसिस पॉईंटची (Repo Rate) वाढ केली आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर खासगी आणि खासगी बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आज आपण कोणत्या बँका सर्वाधिक व्याज देत आहेत? हे जाणून घेणार आहोत..

अनेक बँका आणि वित्तीय संस्था ७% पेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. सप्टेंबरमध्ये महागाईचा दर ७.४ टक्क्यांवर पोहोचला असेल, तर ७ टक्के किंवा त्याहून अधिक व्याजदराची ऑफर अतिशय आकर्षक असणार आहे.

DCB बँक तीन वर्षांच्या FD वर 7.5% व्याज दर देत आहे. त्याच वेळी, एयू स्मॉल फायनान्स बँक देखील तीन वर्षांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर वार्षिक 7.5% व्याज देत आहे. याशिवाय बंधन बँक, सिटी युनियन बँक आणि करूर वैश्य बँक ग्राहकांना तीन वर्षांच्या ठेवींवर ७ टक्के व्याजदर देत आहेत. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बहुतांश बँकांनी नवे व्याजदर जाहीर केले आहेत.

पैसेबाजारचे वरिष्ठ संचालक गौरव अग्रवाल म्हणतात की, मुदत ठेवींवरील व्याजदर थोड्या काळासाठी वाढला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही गुंतवणूक करू शकत असाल तर ही चांगली वेळ आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.