जळगाव जिल्हा

जिल्ह्यातील ४९ महिलांचा क्रीडा नारीशक्ती पुरस्काराने सन्मान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२१ । क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या ४९ महिला क्रीडा शिक्षिका व महिला क्रीडा संचालिका यांना जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, युवा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघातर्फे जिल्हास्तरीय ‘क्रीडा नारीशक्ती सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सद्गुरू बीपीएड कॉलेजच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

पुरस्कार सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयंती चौधरी, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाणे, ऍड. सेजल कदम, पोलिस उपनिरीक्षक योगिता राठोड, पूजा पाटील, उद्योजिका संजना पाटील, अर्चना सूर्यवंशी, एकलव्य क्रीडा पुरस्कारार्थी कांचन चौधरी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी डॉ. प्रदीप तळवलकर आदी उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींतर्फे सविता जाधव, विद्या कलंत्री, छाया पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव राजेश जाधव यांनी केले. यशस्वितेसाठी नीलेश पाटील, किशोर पाटील, योगेश सोनवणे, सचिन महाजन, प्रा.समीर घोडेस्वार, प्रा.हरीश शेळके, गिरीश महाजन, योगेश पवार, विजय विसपुते, सुनील वाघ, देविदास महाजन, सचिन सूर्यवंशी, के.यू.पाटील, राहुल साळुंखे, गिरीश पाटील, अनंतराव जाधव, मनोज वाघ आदींनी परिश्रम घेतले.

यांचा झाला सन्मान
प्रा. डॉ. अनिता कोल्हे, सुजाता गुल्हाने, प्रा. नीलिमा पाटील, प्रा. अंजली बन्नापुरे, स्मिता एडके, मंजूषा भिडे, विद्या कलंत्री, जयश्री माळी, कांचन नारखेडे, प्रा. डॉ. कांचन विसपुते, मीना सपकाळे, प्रा. शालिनी तायडे, मनीषा देशमुख, विजया चौधरी, सरला झांबरे, समिधा सोवनी, सरस्वती पाटील, छाया पाटील, वंदना तिवसकर, कोमल पाटील, श्वेता कोळी, प्रा.डॉ. प्रतिभा ढाके, विद्या खाचणे, प्रा. माधुरी नारखेडे, मीना सिसोदिया, सोनाली दारकोंडे, रोहिणी जाधव, कीर्ती पाटील, सुरेखा पाटील, रूपा कुलकर्णी, स्वाती चौधरी, अनिता पाटील, प्रा. क्रांती क्षीरसागर, मीनाक्षी चौधरी, दुर्गा ठाकरे, सुनीता पाचपांडे, गीता सोनुले, स्निग्धा जोशी, रत्नप्रभा पाटील, अश्विनी कोळी, कुमुदिनी पाटील, प्रतिभा पाटील, रेखा धनगर, वैशाली चव्हाण, सीमा माळदकर, सविता जाधव, सविता जाधव, वसुंधरा पाटील, रत्नमाला सोनवणे, हर्षदा सूर्यवंशी यांना जिल्हास्तरीय ‘क्रीडा नारीशक्ती सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button