जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । रावेर तालुक्यातील मोरगाव-खिरवड रस्त्यावरील नाल्यातून अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक सुरू होती. दरम्यान, तहसीलदार देवगुणे व महसूल पथकाने धडक कारवाई केली. त्यात वाळूची भरलेली चार ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतल्या आहेत. या कारवाईबाबत परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
सविस्तर असे की, सोमवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास मोरगाव -खिरवड रस्त्यावरील नाल्यातून अवैधरीत्या वाळू वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यानुसार तहसीलदार देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी विठोबा पाटील, जी.एन.शेलकर, जी.डी. बंगाळे, सचिन पाटील, सुधीर सोनवणे व तलाठी असे सुमारे १५ जणांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अवैध वाळूची वाहने असलेल्या ठिकाणी रात्रीच तहसीलदार उषाराणी देवगुणे पोलिसांना सोबत घेत पोहचल्या व ही धडक कारवाई केली. यामुळे गौण खनिज वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मात्र वाळू भरण्यासाठी जेसीबीच्या वापर होत होता. परंतु कारवाईची सुगावा लागल्याने ते पसार झाले. सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास महसूल पथकाने घटना स्थळावरून वाळूने भरलेल्या चार ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेतल्या आहेत. त्यात एमएच १९ एएन २४४७, एमएच १९ टी १६३०, स्वराज्य नवीन ट्रॅक्टर विना नंबर, एमएच १९ सीवाय १६४१ या क्रमांकाची वाहने जप्त करण्यात आली.
हे देखील वाचा :
- रेशन कार्डांबाबत मोठी अपडेट; वाचा अन्यथा रद्द होवू शकते तुमचे रेशनकार्ड
- शरद पवार, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पाचोऱ्यात प्रतिउत्तर देणार का ?
- धक्कादायक : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे यावल तालुक्यात महिलेचा मृत्यू
- सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली? ; आमदारांनी फोनवर एकविले डिलिंग
- एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा 26 ऑगस्टला पाचोऱ्यात