⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात प्राण्यांच्या चाव्यांवर ३६४ जणांनी घेतले इंजेक्शन

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात प्राण्यांच्या चाव्यांवर ३६४ जणांनी घेतले इंजेक्शन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राणी चावल्यावर घ्यावयाचे इंजेक्शनसाठी दररोज बाधित रुग्ण उपचार करायला येतात. डिसेंबर महिन्यात ३६४ जणांनी इंजेक्शन घेऊन उपचार घेतले. प्राण्यांमध्ये माणसांना सर्वाधिक चावे कुत्र्यांनी घेतले आहे.

रुग्णालयात ओपीडी वेळेत कक्ष क्रमांक १०५ मध्ये तर दुपारून आपत्कालीन विभागात हे इंजेक्शन दिले जाते. डिसेंबर महिन्यात ३६४ रुग्णांनी उपचार घेतले. यात २३९ पुरुष, ६५ महिला, ४३ लहान मुले, १७ लहान मुली अशांचा समावेश आहे. कुत्र्यांचे चाव्यामुळे २३७ पुरुष, ६४ महिला, ४३ लहान मुले, १७ लहान मुली यांनी प्रतिबंधात्मक इंजेक्शन घेतले आहे. याशिवाय मांजर चावल्यावर २ पुरुष, १ महिला अशा तीन जणांनी उपचार घेतले आहे.

दरम्यान, भटक्या व पाळीव प्राण्यांपासून लहान मुलांना शक्यतोवर दूर ठेवा असे आवाहन उप वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांनी केले आहे. कोणताही प्राणी चावला तर उपचार घेण्यासाठी तातडीने रुग्णालयात यावे. कुत्रा चावला तर जखमेवर परस्पर मलमपट्टी करू नये. वाहत्या पाण्याखाली जखम धुवावी. तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे इंजेक्शन घेण्यासाठी यावे. त्यानंतर दिलेल्या पुढील तारखांना इंजेक्शनचे उर्वरित डोस घ्यावेत असेही डॉ. बावस्कर यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.