⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | राष्ट्रीय | बृजभूषण सिंह विरुद्ध आंदोलन केले म्हणून ३ कुस्तीपटू निलंबित!

बृजभूषण सिंह विरुद्ध आंदोलन केले म्हणून ३ कुस्तीपटू निलंबित!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२३ । राष्ट्रीय कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण सिंह यांना अटक करा, अशी मागणी करत ऑलिंपिंक पदक विजेते आणि देशातील नामवंत कुस्तीपटू गेल्या १५ दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. यासाठी हरयाणातील तीन कुस्तीपटूंना हरयाणा कुस्ती संघाने निलंबित केल्याचे वृत्त आहे.

दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याचा कारणास्तव, हरयाणा एम्येच्युर कुस्ती संघाने वीरेंद्र सिंग दलाल, संजयसिंग मलिक आणि जय भगवान या तिघांचे निलंबन केले आहे. हवा(HAWA) चे अध्यक्ष रोहताश सिंग यांनी एक पत्र जारी करत या तिघांचे निलंबन केले आहे. य.

दिल्लीतील कुस्तीपटूंच्या आंदोलनास दिलेला पाठिंबा हा अनैतिक आहे. हे तिन्ही कुस्तीपटू अद्यापही आंदोलनात सहभागी आहेत. जे WFI व HAWA च्या नियमांचे, उद्दिष्टांचे उल्लंघन आहे, असे रोहताश सिंग यांनी पत्रात म्हटले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह