⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

कलयुगात बहिणीने दाखवली माया, उतारवयात भावाला मूत्रपिंड दान

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२१ ।  साकळी (ता.यावल) येथे ६५ वर्षीय मोठ्या बहिणीने भाऊबीज व रक्षाबंधनाची उतराई म्हणून लहान भावास किडनीदान केली. बहीण-भावाच्या प्रेमाचं आदर्श उदाहरणच लोकांसमोर ठेवले आहे. बहीण-भावाच्या या प्रेमाची तालुक्यात चर्चा आहे.

सविस्तर असे की, साकळी येथील रहीवासी तथा जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांचे मेहुणे व येथील गव्ह कॉन्ट्रॅक्टर आणि येथील गजानन महाराज मंदिर संस्थेचे अध्यक्ष आर.डी पाटील अर्थात राजेंद्र पाटील हे गेल्या सहा वर्षासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना मधुमेहाचा आजार परिवारही अस्वस्थ होत्या. त्यामुळे किडनी कोण देणार याचा शोध सुरु झाला. त्यांच्या पाठच्या पाचही बहिणी रक्ताचं नातं असल्याने आणि ब्लड ग्रुप एक असल्यामुळे किडनी देण्यासाठी पुढे सरसावल्या. पाटील यांना किडनी प्रत्यारोपणासाठी सारोळा ता. नेपानगर (मध्य प्रदेश) येथील त्यांच्या जेष्ठ भगिनी उषा मधुकर मोरे (६५) या पुढे आल्या. भावाचा जीव वाचवणे हे महत्त्वाचं असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. भाऊबीज आणि रक्षाबंधनास भाऊ आम्हाला देत राहिला. आता आम्ही यातून बहिणींनी कधीही न विसरल्याने बंधु प्रेमाची उतराई म्हणून करण्याचा त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे संकल्प केला.

पुण्यात किडनी प्रत्यारोपण

१) पुणे येथील खासगी रुग्णालयात १८ नोव्हेंबर २१ रोजी सुमारे सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेत पाटील त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण करण्यात आली आहे.

२) किडनी प्रत्यारोपण करण्यात आल्यानंतर त्यांच्या परिवाराला आनंदाश्रू अनावर झाले.

३)  बहिण भावाच्या प्रेमाचे सर्वांनी कौतुक केले पाटील यांचा स्वभाव अत्यंत मवाळ असल्याने पाच बहिणींचा लाडका व लहान असल्याने बहिणींनी बंधू प्रेमापोटी आपल्या भावास एक किडनी दान करून बहीण-भावाच्या प्रेमाचा आदर्श निर्माण केला आहे.