जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । मोबाईलवरील व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत एका २९ वर्षीय तरुणाने शेतातील विहीरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. कैलास आनंदा पाटील (रा.म्हसास ता. पाचोरा) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, कैलास याने आत्महत्या का केली याबाबत अद्यापही कळू शकले नाही. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करुन सदरीची नोंद शुन्य क्रंमाकाने पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे.
काय आहे नेमकी घटना?
पाचोरा तालुक्यातील म्हसास येथील एका २९ वर्षीय युवकाने कैलास आनंदा पाटील याने आत्महत्या केली. कैलास याने आत्महत्या करण्यापूर्वी काहीवेळ आधी आत्महत्येबाबत मोबाईलवरील व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवले होते. सदरील स्टेटस नातेवाईक व मित्रांनी बघताच सर्वत्र कैलास पाटील याचा शोध घेतला असता त्याचे काका यांना शेतातील विहीरीत कैलास पाटील याचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांच्या मदतीने कैलास पाटील याचा मृतदेह बाहेर काढुन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
मयत कैलास पाटील याचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदरची नोंद शुन्य क्रंमाकाने पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे. कैलास पाटील याचे पाश्चात्य वृद्ध आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभाव असलेल्या कैलास आनंदा पाटील याच्या अकस्मात मृत्यूने म्ससास गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.