जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी गावात २६ वर्षीय महिलेस मारहाण करुन तिचा विनयभंग केला. ही घटना ८ जून रोजी रात्री ९ वाजता घडली. या प्रकरणी पीडितेने दिलेेल्या फिर्यादीवरुन आठ जणांविरुद्ध पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेस गावातील काही लोक मनोरुग्ण ठरवून चिडवत असतात. घटनेच्या दिवशी महिला तिच्या मुलास शौचास घेऊन जात असताना दिव्या राजेंद्र परदेशी हिने लाथ मारुन तिला खाली पाडले. डोक्यावर चापट मारली. त्यानंतर गावातील काही लोकांनी समजूत काढून महिलेस घरी पाठवले. थोड्या वेळाने दिव्या परदेशी, सुनीता मोतीलाल परदेशी, राधाबाई महावीर परदेशी, सुरेखा शांतीलाल परदेशी, संतोष शिवलाल परदेशी, मोतीलाल मच्छिंद्र परदेशी व शांतीलाल महावीर परदेशी यांनी पीडितेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड केली. महिलेचा गळा दाबला तसेच विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेने दिलेेल्या पिंपळगाव पोलिसात फिर्यादी दिली.