२५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मार्च 13, 2022 2:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । पारोळा तालुक्यातील सांगवी येथे २५ वर्षीय तरुणाने शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. मात्र, मृत्येचे कारण अद्याप समजले नाही.

suiccide jpg webp

विठोबा गणेश पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत विठोबाचे काका भाईदास दशरथ पाटील यांनी पारोळा पोलीस ठाण्यात बातमी कळवली, विठोबा हा घरातून कोणालाही काहीही न सांगता दि. १२ रोजी घरून निघाला होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास चिंचेच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेमागील कारण मात्र कोणालाही समाजल नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now