---Advertisement---
एरंडोल कोरोना

ब्रेकिंग : एरंडोलमध्ये २४ ते २८ मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर… काय असतील नियम जाणून घ्या….

abhijit raut
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस तीव्र होत आहे. एरंडोल तालुक्यात देखील गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. याचमुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २४ ते २८ मार्च २०२१ दरम्यान एरंडोल नगरपालिका क्षेत्रात जनता कर्फ्यू अर्थात लॉकडाऊन लावण्याचे जाहीर केले आहे.

abhijit raut

एरंडोल नगरपालिका क्षेत्रात २४ मार्च २०२१ रात्री ००.०१ पासून २८ मार्च २०२१ रात्री २४.०० वाजेपर्यन्त लॉकडाऊन असेल. या आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्या आहेत.

---Advertisement---

काय सुरू काय बंद?

१) सर्व बाजारपेठा, आठवडे बाजार बंद राहतील.

२) किराणे दुकाने, Non- Essential इतर सर्व दुकाने बंद राहतील. अपवादातुमक परिस्थीतीत रेशन दुकानाबाबत काही वेळ तहसिलदार यांनी ठरवून घ्यावी.

३) किरकोळ भाजीपाला/ फळे खरेदी विक्री केंद्र बंद राहतील.

४) शैक्षणिक संस्था/शाळा/महाविद्यालय, खाजगी कार्यालय, सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद राहतील केवळ पुजारी दैनंदिन पुजा करेल व लोकांना प्रवेश बंद राहील, मान्यंता प्राप्त विद्यापिठाची पुर्व नियोजित परिक्षा असल्यास त्याचे कागदपत्रे दाखवून तहसिल कार्यालयाकडून पास घेवून आयोजन करता येईल.

५) सर्व हॉटेल/रेस्टारंट (अत्यावश्यक सेवेसाठी होम डीलीव्हरी/ पार्सल देणारे हॉटेल वगळता) बंद राहतील.

६) सभा/मेळावे/बैठका/धार्मिक स्थळे, सांस्कृतिक/ धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.

७) शॉपिंग मॉल/ मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलुन, लिकर शॉप/ दारू दुकाने, फेरीवाले,बंद राहतील,

८) गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाटयगृह व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेषकगृहे, क्रिडास्पर्धा, प्रदर्शन, मेळावे, संमेलने बंद राहतील.

९) पानटपरी, हातगाडया, उघडयावर खाद्यपदार्थ विक्रोची ठिकाणे बंद राहतील.

१०) दुधाची दुकाने, मेडीकल दुकाने, वृत्तपत्र सेवा, मिडीया सेवा, कुरिअर, पेट्रोलपंप (अत्यावश्यक व शासकीय सेवेसाठी), रूग्णाल्ना ने-आण करणारी रिक्षा सुरू राहतील. दुधाची दुकाने सकाळी 6 9 आणि सध्याकाळी 5 ते 7 या वेळेत सुरु राहतील.

११) अत्यावश्यक सेवेसाठी गॅरेज,शासकीय का्यालये (५०% उपस्थितीत), पूर्वीचे नियोजित परिक्षा असणारे शाळेचे केंद्र सुरू राहतील.

१२) आंतरराज्य व जिल्हा मान्यताप्राप्त वाहतुक (जसे एस.टी.महामंडळ, पोस्ट विभागाचे वाहने) सुरू राहतोल्न रेल्वे, विमान, बस सेवा सुरू राहील.

१३) मेडीकल उपचार करणारे नागरिक/ रुगृण, त्यांची ने आण करणारे रिक्षा, मेडीकल दुकानातून औषधी घेणारे नागरिक, शासकीय कामावर असणारे कर्मचारी, रेशन घेण्यासाठी येणारे नागरिक, अपवादात्मक परिस्थीतीत प्रवास करणारे वाहन यांना पोलीस / न. प. पथकाला ओळखपत्र / उपचाराचे कागद व इतर कागदपत्रे दाखवावे लागतील.

१४) मेडीकल दुकाने, दुधाची दुकाने, रुग्ण वाहिका, रुग्णाला उपचारासाठी नेणारी रिक्षा, शासकीय कर्तव्यावर असणारी वाहने, आपत्ती व्यवस्थापन व तातडीच्या शासकीय सेवेवर असणारे अधिकारी कर्मचारो, शासकीय कामासाठी नेमलेले पथक व त्यांचे मदतनीस यांना या आदेशातून सुट देण्यात येत आहे.

तसेच इतर शासकीय आस्थापनांना उदा. कृषिविभाग, महावितरण, टेलिफोन) घरपोच सर्वे, सुविधा कामे करावयाची झाल्यास कर्मचा-यांची कोरोना चाचणी करूनच नागरिकांच्या घरी जाता येईल. यासाठी ओळखपत्र जवळ ठेवणे व तहसिल कार्यालय मधून पास घेणे आवश्यक राहिल,

वरीलप्रमाणे एरंडोल नगरपरिषद हद्दीत लागु करण्यात आलेल्या निर्बंधाचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी संयुक्तिकरित्या पोलिस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहिल. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188. आपनी व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रीया संहिता, 1973 चे तरतूदीनुसार शिक्षेस पात्र राहील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---