⁠ 
सोमवार, मे 20, 2024

गांधीधाम एक्सप्रेसमधून सुमारे अडीच लाखाचा २४ किलो गांजा जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| ५ ऑगस्ट २०२३। जळगाव येथील सुरक्षा दलाचे सहाय्यक फौजदार संजय पाटील व जितेंद्र इंगळे श्वान वीरूसोबत अकोला ते भुसावळदरम्यान गांधीधाम एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी (ता. ४) तपासणी करीत होते. गाडीच्या मागील जनरल डब्ब्यामध्ये श्वान वीरूला दोन संशयित बॅग आढळल्या. एका बॅगेमध्ये कपडे, तर दुसऱ्या बॅगमध्ये प्लॅस्टिक पिशवीमध्ये २४ किलो गांजा आढळून आला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरक्षा बलाचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी गांजा जप्त केला.

मलकापूरवरून भुसावळ रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर पोचली असता, भुसावळ स्थानकाचे निरीक्षक राधा किशन मीना, उपनिरीक्षक नंदलाल राम, उपनिरीक्षक विनोद खरमाटे, गोपनीय विभागाचे सुरेश भगत, अवधेश कुमार, अमोल पाटील यांनी जनरल डब्ब्यात प्रवेश केला. सीट क्रमांक २२ ते २५ वर दोन बेवारस बॅग मिळून आल्या. बॅग उघडली असता, अंबट उग्रवास आला व बीज असलेला २४.५२५ किलो ओला गांजा आढळला. त्याची २,४५,२५० रुपये किंमत आहे.

नायब तहसीलदार शोभा राजाराम घुगे यांच्यासमक्ष गांज्याची मोजमाप करण्यात आले. ही कारवाई मंडल सुरक्षा आयुक्त एच. श्रीनिवास राव, सहाय्यक सुरक्षा आयुक्त बी. पी. कुशवाहा यांच्या आदेशावरून निरीक्षक राधा किशन मीना, उपनिरीक्षक के. आर. तर्ड यांनी केली.