जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२१ । जळगावात अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच जळगाव शहरातील एका २२ वर्षीय शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अकील शरीफ खान (वय-३२) याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
शहरातील एका भागात २२ वर्षीय शिक्षिका आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्या एका उर्दू शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. गेल्या दोन महिन्यांपासून अकील शरीफ खान (वय-३२) रा. जळगाव हा शिक्षिकेचा पाठलाग करत होता. बुधवारी २२ डिसेंबर रोजी असाच पाठलाग करत महिलेकडे पाहून अश्लील चाळे व इशारे करून तिचा विनयभंग केला.
याप्रकरणी शिक्षिकेने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तरूणाविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अकिल शरीफ खान रा. शाहूनगर याच्याविरोधात बुधवार २२ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक धनराज निकुंभ करीत आहे.
हे देखील वाचा :
- धक्कादायक ! अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, रुग्णालयात दाखल
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- BRO Bharti : सीमा रस्ते संघटनेत 10 पाससाठी सरकारी नोकरीची संधी; तब्बल 411 पदांसाठी भरती