दुर्दैवी ! वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॉलीखाली दाबल्याने २१ वर्षीय तरुण ठार, दुसरा गंभीर

ऑक्टोबर 21, 2025 11:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । वाळूचे ट्रॅक्टर पलटी होऊन त्याच्या ट्रॉलीखाली दाबल्याने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा २० वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पिंपरीनांदू शिवारात तापी नदी काठावर घडली. तोहीत शाह इस्माईल शाह असं मृत तरुणाचे नाव आहे.

New Project 1 1

याबाबत सलीम शाह करीम शाह (वय ३९, रा. पिप्रीनांदू) यांनी मुक्ताईनगर पोलिसांत खबर दिली. त्यात फिर्यादी व तोहीत शाह इस्माईल शाह हा त्याचे परिवारासह पिंपरीनांदू येथे राहून मजुरीचे काम करतो. २० ऑक्टोबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास चुलत भाऊ तोहीत शाह इस्माईल शाह हा ट्रॅक्टरवर मजुरीचे कामासाठी नदी काठावर गेला. तेथे ट्रॅक्टरमध्ये वाळू भरुन ते ट्रॉलीत बसून घरी येत होते.

दुपारी १२.१५ वाजता ट्रॅक्टर कलंडले. त्यात तोहीत शाह दाबला गेला. पिंप्रीनांदू शिवारातील नदी काठावरील मोहन कुंभार यांच्या विटभट्ट्याच्या बाजूला हा अपघात झाला. नागरिकांच्या मदतीने तोहीतला बाहेर काढून मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. तर अनिकेत संदीप इंगळे (वय २०, रा. पिंप्रीनांदू) हा जखमी झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now