एकता रिटेल पतसंस्थेची २०वी वार्षिक सभा संपन्न!
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । एकता रिटेल पतसंस्थेची विसावी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २४ रोजी दुपारी ४ वाजता खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. सभेस संस्थेचे अध्यक्ष ललीत वरडीया, संचालक दयानंद ग्यानचंद काटारीया, नामदेव वसंत बजारी, राजेश दुनीचंद आहुजा, संचालीका गायत्री दिपक कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता कोलते व संस्थेचे सभासद उपस्थीत होते.
सभेचे सुत्रसंचालन प्रणिता कोलते यांनी केले. प्रास्तावीक गायत्री कुलकर्णी यानी केले. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष के धनश्यामदास अडवाणी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सस्थेची आर्थिक परीस्थीती, नफा तोटा व ताळेबंद पत्रकावर सविस्तर चर्चा केली व आता पर्यंत संस्थेस ऑडीट वर्ग “अ” मिळत होता तो गेल्या दोन वर्षापासून “व” कसा मिळाला तसेच लेखापरिक्षण अहवालातील मार्कलिस्ट विषयी सभेत सविस्तर चर्चा केली. तसेच सभासदासाठी १५ टक्के डिव्हीडंड जाहीर केला.
त्यानंतर सभेच्या विषय पत्रिकेतील विषयांवर कमवार चर्चा करण्यात आली. सदर विषय संस्थेच्या संचलिका गायत्री कुलकर्णी, व्यवस्थापक प्रवीण कोतकर, राधिका देसाई, हर्षा कुलकर्णी व किरण माहेश्वरी यांनी सादर केले. उपस्थित सर्व सभासदांनी एकमताने मंजुर केले. सभेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे कर्मचारी कल्पना पाटील, नितीन पाटील, किसन कदम व सुभाष साळुंखे यांनी परिक्षम केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता कोलते यांनी आभार मानले.