---Advertisement---
जळगाव जिल्हा

जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात ‘डीन’ चा गोंधळ

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । जळगावातील शासकीय वैद्यकीय रुणालय व महाविद्यालयात आज डीन च्या खुर्चीवरून ”तुतू मैमै” असा काहीसा प्रकार घडलाय. डॉ.मिलींद फुलपाटील यांनी सकाळीच डीन’च्या खूर्चीचा ताबा घेत पदभार मिळालेला नसताना मीच ‘डीन’ असे सांगितले. तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या संचालकांनी डीन डॉ. जयप्रकाश रामानंद याना दोन दिवस (बुधवारपर्यंत) वाट पहा असे सांगितले आहे.

Untitled design 36 jpg webp

अचानक घडलेल्या प्रकारामुळे महाविद्यालय व रुग्णालयात डीन म्हणून कोण हा प्रश्न उद्भवून दिवसभर डॉक्टर्स, नर्सेस व स्टाफ विचारात पडल्याचं दिसून आलं. जळगावचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सव्वा वर्षाचा कालावधी झाल्याने त्याच्या बदलीला शहरातील अनेक संघटनांनी विरोध दर्शविला होता. ‘जीएमसी’ मध्ये २६ ऑगस्टरोजी  वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी जळगावच्या ‘डीन’ पदावर नागपूरच्या शरिर रचना शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.मिलींद फुलपाटील यांची जळगावला शरिर रचना शास्त्र विभागात बदली करून डीन पदाचाअतिरिक्त कार्यभार सोपविला होता.

---Advertisement---

७ सप्टेंबरला डॉ.फुलपाटील हे जळगावला येवून पदभार घेवू लागले असता, शरिर रचना शास्त्रविभागात प्राध्यापकाचे रिक्त पद नसल्याने ते चार दिवस थांबून होते. त्यांच्या नियूक्तीचे पद रिक्त नसल्याने डीन रामानंद यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाला तसे कळविले होते. त्यावर मार्गदर्शनही मागविले होते. दहा ते बारा सप्टेंबर दरम्यान शासकीय सुटी असल्याने त्यांनी सुटी टाकून तसा पत्रव्यवहार वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाच्या सचिवांना केला होता.

याच कालावधीत डीन डॉ.रामानंदही शासकीय सुटी असल्याने गावी गेले होते. आज सकाळी डॉ.फुलपाटील हे डीन डॉ.रामानंद यांच्या खूर्चीत जावून बसले. मी आजपासून कार्यभार पाहत असल्याचे त्यांनी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला कळविले व खुर्चीत जावून बसले रुग्णालयात एकच धावपळ उडाली. दरम्यान डॉ.रामानंद यांनी डॉ.फुलपाटील यांनी डीन पदाच्या खूर्चीचा ताबा घेतल्याने त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाल कळविले. व ते कार्यालयात न जाता रूमवरच थांबणे पसंत केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---