Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । साडेचार वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या एका वृद्ध आरोपीस न्यायालयाने दोषी धरुन २० वर्षे सश्रम कारावास व साडेपाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. रवींद्र पुना रंधे (वय ६३, रा. विवेकानंदनगर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.
रवींद्र पुना रंधे याने परिसरात राहणाऱ्या एका साडेचार वर्षीय बालिकेला घरात बाेलावून अत्याचार केला हाेता. बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी पोलिसांनी रंधेला अटक केली. न्यायालयात दोषारोप दाखल झाल्यानंतर डी. वाय. काळे यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात आले. पीडित बालिकेची साक्ष व उलट तपासणी एकाच दिवसात पूर्ण झाली.