जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ । भडगाव शहरातील टोणगांव शिवारातील शेतातील विहीरीत २० वर्षीय तरुणाचा बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली दि.२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सागर मोहन चव्हाण (वय-२० वर्ष रा.यशवंत नगर वरची बर्डी भडगांव) असे मृत तरुणाचेनाव असून याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत भडगांव पोलीस स्टेशनला उत्तम चव्हाण (रा.गुढे ता.भडगाव) मयताचे काका यांनी दिलेल्या खबरीत नमुद केले आहे कि, भडगांव जुने पिंपळगाव रस्त्यालगतच्या टोणगांव शिवारातील सादिक पठाण या शेतकऱ्यांच्या शेतातील विहीरीत मयत सागर चव्हाण या तरुणाचा पाण्यात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली मयत तरुण हा पिंपळगावहुन भडगांव कडे येत असतांना शेतातील विहीरीत पाय घसरुन पडला असावा.
मयताचे प्रेत विहीरीत मयत स्थितीत शेत मालकाला दिसुन आले. विहीरी जवळ मयताच्या चपला व पिशवी पङलेली होती. मयत तरुणाचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळुन आले. अशी माहिती पोलीसांनी दिली. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेङ काॅन्सटेबल प्रल्हाद शिंदे हे करीत आहेत. या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.
रमेश संतोष सोनवणे वय ३२ वर्ष रा. बाळद खु . ता. भङगाव या तरुणाने विहीरीच्या पाण्यातुन मयत तरुणाचे कुजलेले प्रेत तब्बल २० मिनीटात बाहेर काढले.