जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । अवैधरीत्या उत्खनन करणारे जेसीबी मशीन व दाेन ट्रॅक्टर महसूल विभागाने जप्त केले. ही कारवाई बाेदवड आणि भुसावळ महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने केली. प्रभारी तहसीलदार एस.जे.इंगळे यांनी संबंधितांना दंडाची नाेटीस बजावली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
भुसावळ तालुक्यातील शिंदी गावाजवळ अवैध गाैणखनिजची वाहतूक हाेत आहे. सोबतच काही लोक उत्खनन देखील करत असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली. यानुसार मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाने अचानक घटनास्थळ गाठून पाहणी केली. तेथे एक जेसीबी, दाेन ट्रॅक्टर मिळून आले. यानंतर पथकाने एमएच.२८-टी ९९८५ क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त करून अनिका पाटील यांना १ लाख रूपये दंडाची नाेटीस बजावली. यानंतर एमएच.१९.बीजी.५४५७ क्रमांकाचे ट्रॅक्टर देखील ताब्यात घेत रोहिदास प्रकाश खाचणे यांना १ लाख ११ हजार ९२० रूपये दंडाची नाेटीस बजावली आहे. सुनील पाटील यांचे जेसीबी देखील जप्त केले.
याप्रकरणी जेसीबी मालक पाटील यांना ७ लाख ५० हजार रूपये दंडाची नाेटीस प्रभारी तहसीलदार एस.जे. इंगळे यांनी बजावली आहे. यामुळे खळबळ उडाली.
हे देखील वाचा :
- रेशन कार्डांबाबत मोठी अपडेट; वाचा अन्यथा रद्द होवू शकते तुमचे रेशनकार्ड
- शरद पवार, उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पाचोऱ्यात प्रतिउत्तर देणार का ?
- धक्कादायक : बोगस डॉक्टरच्या उपचारामुळे यावल तालुक्यात महिलेचा मृत्यू
- सव्वा कोटींच्या टेंडरमध्ये २० लाखांची लाच कशी द्यावी लागली? ; आमदारांनी फोनवर एकविले डिलिंग
- एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा 26 ऑगस्टला पाचोऱ्यात