⁠ 
गुरूवार, डिसेंबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | नोकरीचे आमीष दाखवून २ लाखांची फसवणूक

नोकरीचे आमीष दाखवून २ लाखांची फसवणूक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील विखरण येथील सचिन त्र्यंबक अहीरे ( वय २८) या तरुणाच्या अज्ञात आरोपीने विदेशात नोकरीसाठी निवड झाल्याचे भासवुन १ लाख ८१ हजार ५२५ रूपयांचा ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

तालुक्यातील विखरण येथील अहीरे यांच्या मेलवर अज्ञात आरोपीकडून विदेशात नोकरीसाठी निवड झाल्याचे भासवुन ऑनलाइन पध्दतीने बँक खात्यात नोंदणी शुल्क भरण्यास सांगण्यात आले. नोकरीसाठी वेळोवेळी अज्ञात आरोपीने सांगीतल्याप्रमाणे ऑनलाइन पध्दतीने बँकेत रकमेचा भरणा केला. मात्र, काही दिवसांनी अज्ञात आरोपीकडून प्रतीसाद मिळत नसल्याने अहीरे यांनी [email protected] वर चौकशी केली असता फसवणुक झाल्याचे निष्पन्न झाले.

एरंडोल पोलिस स्टेशन गाठत परदेशी नोकरीच्या प्रलोभनास बळी पडून १ लाख ८१ हजार ५२५ रूपयांची अप्रामाणिकपणे संगणक साधनाद्वारे फसवणुक झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह