---Advertisement---
धरणगाव

दुष्काळात तेरावा महिना ; २ एकर मका जळून खाक

dharangaon
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२१ । धरणगाव शिवारातील शेतमालक सुकलाल गंगाराम माळी यांच्या शेतात आज दि. ३० मार्च रोजी दु. ३ वाजेच्या सुमारास धरणगाव – सोनवद रस्त्याला लागून असलेल्या शेतात इलेक्ट्रिक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागली. या आगीत २ एकर मका भुट्ठा चारासह जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

dharangaon

मिळालेल्या माहितीनुसार, दोन एकराच्या परिसरामध्ये सुकलाल गंगाराम माळी नामक शेतकऱ्यांनी मका पिकवला होता. श्री. माळी यांच्या शेताच्या परिसरात अचानकपणे शॉर्टसर्किट झाल्यामुळे येथे आग लागली आणि शेतातील मका पिकाने अचानकपणे पेट घेतला. लागलेल्या आगिमुळे या सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

---Advertisement---

दरम्यान, महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शेतातील जमिनीवर निघालेला मका भुट्ठा सह चारा जळाल्याचा आरोप या सर्व शेतकऱ्यांनी केला आहे. या आगीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याने मायबाप सरकारला नुकसान भरपाई मिळावी म्हणून विनंती केली आहे. तसेच, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख यांनी शासन, प्रशासनाला विनंती केली आहे की, आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन, प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून त्वरित मदत करण्याचीही मागणी केली आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख भाऊ देशमुख यांनी धरणगाव नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाला फोन लावून झालेली घटना सांगितली, त्याच क्षणी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, गटनेते विनय भावे यांनी तात्काळ फायर फायटर व टँकर घटनास्थळी वेळेवर पाठविले. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानाची हानी टळली. व टीमने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या शॉर्टसर्किटमध्ये शेतातील मका जळाला आहे. विशेष म्हणजे शॉर्टसर्किटमुळ पीक जळाल्याची धरणगाव तालुक्यात अनेक घटना घडल्या आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---