---Advertisement---
राष्ट्रीय

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी २.४० लाख कोटींची तरतूद

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी मोदी सरकारचा पूर्णवेळ असलेला शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2023-24) संसदेत सादर केला. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. सन २०१३ च्या तुलनेत भारतीय रेल्वेला (Indian Railway) केंद्र सरकारने ९ पट अधिक मदत, निधी दिल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. तसेच रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास आणखी गतीने व्हावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असणार आहे. रेल्वेच्या विविध योजनांसाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच भारतीय रेल्वेत खासगी क्षेत्रातील भागीदारी, गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असेल, असे निर्मला सीतारामन यांनी नमूद केले.

budget jpg webp webp

भारतीय रेल्वेसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात बंपर निधीची घोषणा करण्यात आली आहे. पुढील वर्षात रेल्वेसाठी २.४० लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेचे नवे मार्ग, नव्या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेच्या १०० महत्त्वाच्या योजना प्राधान्याने राबवल्या जाणार असून, रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यावर भर दिला जाणार असून, रेल्वेसाठी डिजिटल तिकीट प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे, असेही निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---