fbpx

एलईडी बल्ब घोटाळा ; माजी सरपंचासह दोघा ग्रामसेवकांविरोधात गुन्हा दाखल

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील खडकी बुद्रुक ग्रा.पं.च्या एलईडी बल्ब गैरव्यवहार प्रकरणी माजी सरपंचासह दोघा ग्रामसेवकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आयपीसी 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.  माजी सरपंच मिराबाई आनंदा जाधव, तत्कालीन ग्रामसेवक विजय चौधरी व ईश्वर भोई या तिघांनी संगनमताने 3 डिसेंबर 2015 ते 6 नोव्हेंबर 2017 या कालावधीत 2 लाख 34 हजार 520 रुपये किमतीचे एलईडी बल्ब शासन निर्णयानुसार खरेदी न करता कोटेशन पद्धतीने खरेदी करून ग्रामनिधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतील 2 लाख 34 हजार 520 रुपये अपहार केल्याचा ठपका यांच्यावर चौकशीअंती ठेवण्यात आला होता. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टाकले हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज