किडेक्स नॅशनल ऑलराउंडर चॅम्पियनशिपमध्ये कार्तिक भावे भारतातून तिसरा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । किडेक्स नॅशनल ऑलराउंडर चॅम्पियनशिपमध्ये कार्तिक भावे भारतातून तिसरा तर वेस्ट झोनमधून पहिला आला आहे. या चॅम्पियनशिपमध्ये संपूर्ण भारतातून ९८४ शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. यात ३० वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेण्यात आले होते. कार्तिकने हा बहुमान केवळ पाच वर्षांचा असताना मिळवला.

किडेक्स नॅशनल ऑलराउंडर चॅम्पियनशिप वर्षातून दोनदा होते. ९० दिवसांच्या स्पर्धेत दर ३० दिवसांत ३० वेगवेगळ्या उपक्रमांतून मुलांची परीक्षा घेण्यात येते. यात त्याने विचारलेल्या अॅक्टिव्हिटीचे ऑनलाइन व्हिडिओ बनवून तो स्पर्धेत सहभागी झाला होता. गेल्याच महिन्यात कार्तिकची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येदेखील नोंद झाली आहे. कार्तिक हा प्रियांका व मिहीर भावे (पुणे) यांचा मुलगा, संजीवनी व दीपक भावे (नाशिक) व विजया व संदीप कुलकर्णी (जळगाव) यांचा नातू आहे.

पाच थिमद्वारे परीक्षा
३० दिवसांत पाच थिममधून सहा अॅक्टिव्हिटी घेण्यात येतात. यात शारीरिक, क्रिएटिव्हिटी, लँग्वेज कम्युनिकेशन, सामाजिक भावना आदी प्रकारच्या परीक्षा घेण्यात येतात. यातील ४ थिममधून तो नॅशनल रँकमध्ये पहिला तर एकामध्ये दुसरा आला. या सर्व स्पर्धांतून ऑलराउंडर टॉप थ्री मुले काढली. यातदेखील तो तिसरा आला.

या स्पर्धांत अव्वल
भारतातील ईस्ट, वेस्ट, साऊथ व सेंटर असे चार झोन तयार करून ही स्पर्धा घेण्यात आली. यात बोटावर बॉल धरणे, घरात दुकान तयार करून त्याची जाहिरात करणे, भाषेचे ज्ञान, विषय मांडण्याची हातोटी आदी स्पर्धात कार्तिक हा अव्वल ठरला.

इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नोंद
गेल्याच महिन्यात कार्तिक मिहीर भावेने इंडिया बुक रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले गेले. या वेळी तो अवघा पाच वर्षे वयाचा होता. यात त्याने वेगवेगळ्या १५० देशांचे राष्ट्रध्वज व विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कारचे लोगो ओळखून दाखवल्याने त्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचा कीर्तिमान केला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -