---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

नशेखोरांना जोरदार दणका; पाच महिन्यांत १८ गुन्हे व ५३१ किलो साठा जप्त!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| २२ ऑगस्ट २०२३| दिवसेंदिवस तरुणाईमध्ये वाढत जाणारी अमली पदार्थांची ‘नशा’ उतरविण्यासाठी पोलिसांकडून अशा पदार्थांची वाहतूक करणारे व सेवन करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. यात कारवाईचा धडाका लावात पाच महिन्यांत ७८ लाख ५३ हजार ८२० रुपये किमतीचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच गांजाची नशा करणाऱ्या १४ जणांना अटक करण्यात आले.

image 54 jpg webp webp

केळी, कपासाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या काही वर्षात अमली पदार्थांची विक्री करणारे व सेवन करणारे पाय पसरवू पाहत आहेत. यात जिल्ह्यात गांजाची शेती करणाऱ्यावर कारवाई देखील झाली. मागील काही वर्षात गर्दृल्ल्यांची संख्या वाढून नशेमध्ये असताना त्यांचे वाढ देखील होतात. वेगवेगळ्या कारणांनी तणावात असलेले तरुण तरुणी नशेच्या आहारी जातात. काही जणांना दिवसरात्र नशेमध्ये राहण्याची सवय जडते. याला आळा बसणे आवश्यक आहे.

---Advertisement---

यासाठी पोलिसांकडून कारवाई हाती घेण्यात आली. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून अमली पदार्थ विक्रेते व नशेखोरांवर कारवाई करण्यात येत आहे.
पाच महिन्यांमध्ये पोलिसांनी ७८ लाख ५३ हजार ८२० रुपये किमतीचे अमली पदार्थ हस्तगत केले. त्यात ५३१ कोळी २९१ ग्रॅम गांजा असून १३.१४० ग्रॅम ३९ हजार ४२० किमतीच्या मेफेड्रोन या अमली पदार्थाचा समावेश आहे.

यात गांजा जप्त करण्यासह सहा जणांना अटक करण्यात केली. त्याव्यतिरिक्त १४ जणांना नशा करताना पकडुन अटक करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ८०० रुपये किमतीचा ४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---