जळगाव लाईव्ह न्युज | २५ ऑगस्ट २०२१| आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री व मंगरूळ येथे विविध विकासकामांचा भुमिपुजन व उद्घाटन सोहळा पार पडला.

याप्रसंगी भास्कर पाटील, चहुत्रे, तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील , शहरप्रमुख अशोक मराठे, पारोळा बाजार समिती संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, मधुकर पाटील, प्रा.बी.एन.पाटील सर, प्रेमानंद पाटील, मा.नगराध्यक्ष दयाराम पाटील, नियोजन समिती सदस्य विजु पाटील, धुळपिंप्री सरपंच संजु पाटील, उपसरपंच आर.डी.पाटील, पंचायत समिती सदस्य पांडुनाना पाटील, भिडु जाधव, शेतकी संघाचे चेअरमन अरूण पाटील, व्यवस्थापक भरत पाटील , मालखेडा सरपंच समाधान पाटील, राजु शेळावे, मुन्ना पाटील, मंगरूळ, पळासखेडे सरपंच विनोद पाटील, भैय्या पाटील, रताळे, बबलू मंगरूळ, गोटुनाना पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

आमदाराच्या हस्ते या कामांचे उद्घाटन, लोकर्पण व भुमिपुजन करण्यात आले

१) मौजे मंगरूळ ता.पारोळा येथे गावात काँक्रीटीकरणासह रस्ता व भुमीगत गटारीचे बांधकाम करणे. – ४० लक्ष
२) मौजे धुळपिंप्री ता.पारोळा येथे गावाजवळ लहान पुलाची पुर्नबांधणी करणे. – ३५ लक्ष
३) मौजे धुळपिंप्री ता.पारोळा येथे डिजीटल अंगणवाडी बांधकाम करणे. – ५ लक्ष
४) मौजे धुळपिंप्री ता.पारोळा येथे हनुमान मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे. – १० लक्ष
५) मौजे धुळपिंप्री ता.पारोळा येथे गावांतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे. – ३ लक्ष
६) मौजे धुळपिंप्री ता.पारोळा येथील उपसरपंच श्री.आर.डि.पाटील यांच्यातर्फे गावासाठी भेट दिलेल्या शवपेटीचा लोकार्पण सोहळा.
७) मौजे धुळपिंप्री ता.पारोळा येथे पेव्हर ब्लाॕक बसविणे. – ३ लक्ष










