⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | गुन्हे | हॅल्लो ईडी ऑफिसमधून बोलतोय.. अन् भुसावळच्या अभियंत्याला १५ लाखात गंडविलं, गुन्हा दाखल

हॅल्लो ईडी ऑफिसमधून बोलतोय.. अन् भुसावळच्या अभियंत्याला १५ लाखात गंडविलं, गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जून २०२४ । देशासह महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या घटना वाढल्या असून रोज फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल होत आहे. अनेकांना वेगवेगळे आमिष दाखवून गंडविले जात आहे. याच दरम्यान भुसावळ येथील एका अभियंत्याला अज्ञात सायबर भामट्यांनी १५ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तुमच्याविरुद्ध ईडी ऑफिसमध्ये तक्रार झाल्याचे सांगत, तुम्हाला केव्हाही अटक होईल, अशी भीती घालून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत गुरुवार, दि.२७ जून रोजी दुपारी सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील ५० वर्षीय अभियंत्यास बुधवारी, दि.२६ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून तुमचा फोन दोन तासात बंद होईल असे सांगण्यात आले. फिर्यादीने कारण विचारले असता, तुम्ही मोबाईल क्रमांकावरून गैरप्रकार केला असून त्याबाबत मुंबई येथे तक्रार दाखल झाली आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास त्यांना दुसरा कॉल आला. त्या व्यक्तीने टिळक नगर पोलिस स्टेशनमधील पोलिस इन्स्पेक्टर विनायक बाबर बोलत असल्याचे सांगितले.

तुमच्याविरुद्ध टिळक नगर पोलिस स्टेशन मुंबई येथे तक्रार दाखल झाली असून फिर्यादीला विविध कागदपत्रे मागविण्यात आली. फिर्यादीने कागदपत्रे पाठवल्यानंतर त्यांना सायबर भामट्यांनी इडी ऑफिसचे बनावट पत्र पाठविले. तुमच्या नावाने अटक वॉरंट तयार असून ते थांबवायचे असल्यास १५ लाख रुपये रक्कम द्यावी लागेल असा दम भरला

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.