⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

वारकऱ्यांनो लक्ष्य द्या! जळगाव विभागातर्फे पंढरपूर वारीसाठी 135 बसेस सोडण्यात येणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । यंदा २९ जून रोजी आषाढीला‎ पंढरपूरची यात्रा असून यासाठी जिल्हाभरातून हजारो प्रवासी‎ पंढरपूरकडे जातात. वारकऱ्यांच्या सोयीसाठी जळगाव विभागातर्फे पंढरपूर वारीसाठी १३५‎ बसेस सोडण्यात येणार आहे. तीन‎ टप्प्यात या बसेस सोडण्यात येणार‎ आहेत. यंदा‎ महिला, ज्येष्ठ नागरिक‎ सवलतीमुळे वारीतील प्रवाशांची‎ संख्या २५ टक्के वाढणार असल्याने जादा बसेल धावतील.

प्रवाशांच्या‎ सोयीसाठी इतर आगारांना मदत‎ म्हणून यंदा जालन्यासाठी ५०,‎ अहमदनगरसाठी ७५ बसेस‎‎ पाठवण्यात येणार आहे. या १२५‎ बसेस तिकडे जाणार असल्या तरी‎ यामुळे जिल्ह्यांतर्गत कोणत्याही‎ फेऱ्या कमी होणार नाहीत. तीन‎ टप्प्यात बसेस सोडण्यात येणार‎ आहेत.

पहिला टप्पा २४ ते २५ जून‎ दरम्यान जिल्ह्यातून १०० बस‎ सोडण्यात येणार आहेत. २६ ते २७‎ जून दरम्यान १२५ बस तर २८ व २९‎ जूनला ४० बसेस पंढरपूरला‎ धावणार. परतीच्या प्रवासासाठी ३०‎ जूनला द्वादशीला पंढरपूर आगारात‎ या १३५ बसेस तैनात असणार आहे.‎ तसेच एकाचवेळी ३० पेक्षा अधिक‎ प्रवाशी, परिवार असल्यास‎ पंढरपूरसाठी बस सोडली जाणार‎ असल्याचेही वाहतूक अधिकारी‎ दिलीप बंजारा यांनी सांगितले.