⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पुन्हा ब्लॉक, भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ १३ गाड्यांना पुन्हा होणार विलंब

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जानेवारी २०२२ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील दुसखेडा-सावदा दरम्यान दुरुस्ती कामासाठी बुधवारी (दि.१९) सकाळी ८.२० ते १.५५ या साडेपाच तासांसाठी रेल्वे प्रशासनाने ब्लाॅक घेतला आहे. यामुळे अप-डाऊन मार्गावरील १३ गाड्यांना विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर थांबवले जाणार आहे.

दुसखेडा-सावदा (हतनूर ब्रिज) डाउन मार्गावर सकाळी ८.२० ते दुपारी १.५५ वाजेपर्यंत प्लेट गर्डर्स रोडचे लिफ्टिंग आणि बऱ्हाणपूर येथे सकाळी ९.१५ ते दुपारी १२.१५ पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेतला अाहे. ट्रॅफिक ब्लॉक दरम्यान मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या अप आणि डाउन रहदारीवर परिणाम हाेणार अाहे. भुसावळ विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर ब्लाॅकच्या काळात पाच गाड्या थांबवल्या जाणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसाेय हाेईल. गेल्या आठवड्यातदेखील रेल्वे ब्लाॅकमुळे २१ गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते

आता बुधवारच्या ब्लॉकमुळे एलटीटी-गोरखपूर कुशीनगर डाउन आणि गाडी क्रं. १५६४५ एलटीटी-गुवाहाटी एक्स्प्रेस ८.२० ते १.५५ पर्यंत बऱ्हाणपूरला आणि गुवाहाटी-एलटी अप, गाडी क्रं.१२५३३ लखनऊ-मुंबई अप, गाडी क्रं.२२५३८ एलटीटी-गोरखपूर आणि गाडी क्रं. १९४८३ अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस सकाळी ९.१५ ते दुपारी १२.१५ या वेळेत बऱ्हाणपूरला थांबवण्यात येईल. अप नवी दिल्ली-बंगलोर एक्स्प्रेस १२ ते १२.२० पर्यंत २० मिनिटांसाठी असिरगढ, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस नेपानगरला १२ ते १२.२०, तर डाऊन मार्गावरील अहमदाबाद-बरौनी एक्स्प्रेस भुसावळला ११.४५ ते १.४५, एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस भुसावळला १२.२० ते १.५५ पर्यंत, एलटीटी-फैजाबाद एक्सप्रेस भादलीला १२.१० ते १.५० पर्यंत, वास्को द गामा-निजामुद्दीन एक्स्प्रेस जळगावला १२.३५ ते १३.५० आणि एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस १.२० ते १.५० पर्यंत शिरसोली येथे थांबवण्यात येईल.

हे देखील वाचा :