बातम्या
स्व.पि.व्ही.माळीदादा स्मरणार्थ आयोजित भव्य जलतरण स्पर्धेत १२५ जलतरणपटुंनी केली ऑनलाईन नोंदणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । जलतरण या क्रीडाप्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गरीब ,होतकरू आणि गुणी जलतरणपटूंना भरीव मदत करण्याच्या दृष्टीने येथील लक्ष्मी ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने व जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त सहकार्याने रविवार दि . १७ एप्रिल २०२२ रोजी स्व. पि.व्ही. माळीदादा स्मरणार्थ भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील स्पर्धत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रवेशिका दिनांक १२ एप्रिल पर्यंत मागविण्यात आल्या होत्या. प्रवेशासाठी कुठलेही शुल्क आकारले गेले नाही .
या स्पर्धेसाठी जळगाव ,धुळे औरंगाबाद इत्यादी ठिकाणच्या विविध वयोगटातील १२५ स्पर्धकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे . स्पर्धकांना क्रीडासाहित्य , नाश्ता , दुपारचे भोजन मोफत दिले जाणार आहे . सदर स्पर्धा ५ वेगवेगळ्या गटात घेतल्या जाणारआहेत . जळगाव पोलीस जलतरण तलाव , पोलीस मुख्यालय परिसर येथे सकाळी १० ते ३ या वेळेत या स्पर्धा होणार असून स्पर्धेचे उदघाटन जळगावचे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या शुभहस्ते नियोजिले आहे तर जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन हे विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत .
स्पर्धकांनी स्पर्धेच्या ठिकाणी दिनांक १७ /४/२०२२ रोजी सकाळी ९-३० वाजता रिपोर्टींग करणे आवश्यक आहे. येतांना सोबत अलीकडचा पासपोर्ट फोटो आणावा.स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी श्री. कमलेश नगरकर मो. क्र. ९४२३४९१८०८ , व गायत्री येरपाल मो. क्र . ७३९७८०३५७७
यांचेशी संपर्क साधावा तसेच जलतरणपटू व क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले