गुन्हेचाळीसगाव

३०० फूट खोल दरीत कोसळला तांदळाचा ट्र्क, उडी मारल्याने चालक, क्लीनर बचावले

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२२ । कन्नड घाटात मंगळवारी सकाळी एक मोठा अपघात झाला असून प्रसंगावधान राखल्याने चालक आणि क्लिनर बचावले आहे. धुळे-साेलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२‎ वरील कन्नड घाटात औरंगाबादकडून, धुळ्याकडे जाणाऱ्या तांदळाच्या ट्रक घाटातील मल्हार गडाजवळील मेणबत्ती पॉइंटजवळ ब्रेक फेल झाल्याने ३०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रक दरीत काेसळण्यापर्वी चालकाने व ट्रकच्या क्लीनरने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने सुदैवाने जिवितहानी टळली. मात्र, अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले, तसेच घाटातील वाहतूक सुरळीत केली.

accident kannad ghat

मंगळवारी सकाळी तांदळाचा ट्रक क्रमांक ए.पी.२९-टी.व्ही.११६६ हा औरंगाबादकडून धुळ्याच्या दिशेने जात हाेता. ट्रक कन्नड घाटात युटर्नजवळ पाेहचल्यावर १०.३० वाजेच्या सुमारास ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. घाटातील मेणबत्ती पॉइंटजवळ चालकाने ट्रकवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न केला. पंरतु यश न आल्याने चालक व क्लीनरने वेळीच ट्रकमधून उडी घेतली, त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.

महामार्ग पाेलिस सकाळी घाटात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना एका दुचाकी चालकाने अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच महामार्ग पाेलिस केंद्राचे सहाय्यक निरीक्षक भागवत पाटील, उपनिरीक्षक सुनील पवार, हवालदार शामकांत साेनवणे, धनराज पाटील व अन्य पाेलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्यांना ट्रक दरीत कोसळलेला दिसून आला. तर चालक व क्लीनर भेदरलेल्या अवस्थेत आढळले. पाेलिसांनी त्यांना धीर दिला, तसेच वाहतूक सुरळीत केली.

हे देखील वाचा :

    चेतन वाणी

    पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

    Related Articles

    Back to top button