⁠ 
मंगळवार, ऑक्टोबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | चॉकलेट, पैशांचे आमिष देऊन 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार ; चाळीसगावातील धक्कादायक प्रकार

चॉकलेट, पैशांचे आमिष देऊन 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार ; चाळीसगावातील धक्कादायक प्रकार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 16 जानेवारी 2024 । चॉकलेटसह पैसे देण्याचे आमिष दाखवून आणि वडीलांना मारून टाकण्याची धमकी देत एकाने अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार चाळीसगावमधून समोर आला आहे. याबाबत नराधमाला अटक करण्यात आली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमका प्रकार काय?
चाळीसगाव शहरातील एका भागात ११ वर्षाची अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मुलगी ही तिच्या घरासमोर अंगणात खेळत असतांना संशयित आरोपी असफाक खान रऊफ खान याने तिला जवळ बोलावून चॉकलेट आणि १०० रूपये दिले. तसेच तिच्या वडीलांना मारून टाकण्याची धकमी देत तिला घरात नेवून तिच्यावर अत्याचार केला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी असफाक खान रऊफ खान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक बिरारी हे करीत आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.