जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । पाचोरा पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध विकास कामांसाठी गत आठवड्यात झालेल्या राज्य विधानसभेच्या पाच दिवसांच्या अधिवेशनात १०० कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाल्याचे माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उपजिल्हा रुग्णालय, राज्य महामार्ग व मागासवर्गीय वस्ती सुधारणांसाठी हा निधी खर्च हाेईल, असेही ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, तालुकाप्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, उद्धव मराठे, अनिल पाटील, पंढरीनाथ पाटील, शिवदास पाटील, अंबादास सोमवंशी, नगरसेवक सतीश चेडे, बापू हटकर, प्रवीण ब्राह्मणे उपस्थित होते.
या कामांसाठी होणार निधी खर्च
दाेन्ही तालुक्यातील नगरदेवळा- गाळण- तारखेडा, कजगाव- गोंडगाव- शिंदी, कजगाव- नागद, पाटणादेवी- वाडे- गोंडगाव -कनाशी रस्ता, वाडे- गोंडगाव, कनाशी- देव्हारी, बाळद- वडगाव- कनाशी- गाेंडगाव , पांढरद- वडजी, वाडे- नावरे या रस्त्यांसाठी २१ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मिळेल , ग्रामीण भागातील तारखेडा- सारोळा, तारखेडा- लोहटार, डांभुर्णी- अंबे वडगाव, होळ ते होळ फाटा, शेवाळे ते खडकदेवळा, सावखेडा मंदिर ते वरखेडी, बाळद ते उपलखेडा, लासुरे ते लासुरे फाटा, शिंदाड ते सातगाव, लासगाव ते कुरंगी, वडगाव टेक ते वडगाव असेरी, पिंपळगाव खुर्द ते धनगरवाडी, पहाण ते पहाण फाटा, लोहारी ते साजगाव, खडकदेवळा ते मोंढाळे, लासुरे ते राजुरी, सावखेडा ते चिंच फाटा, मोंढाळा ते डोंगरगाव, अंतुर्ली ते भातखंडे, लासगाव ते आसनखेडा, अंतुर्ली बुद्रूक ते सावखेडा, बदर्खे ते मोहलाई, नगरदेवळा ते पिंपळगाव, सार्वे ते पिंप्री, पिंपळगाव (हरे.) ते बहुलखेडा, शिंदाड ते सातगाव अादी ५७ रस्त्यांसाठी २० कोटी रुपये, मागासवर्गीय वस्तीसाठी २५ गावांत २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तर पाचोरा येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या ५० खाटांसाठी ४० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. लवकरच या सर्व कामांची वर्क ऑर्डर निघणार असल्याची माहिती यावेळी आमदार किशोर पाटील यांनी दिली. उपजिल्हा रुग्णालयामुळे दाेन्ही तालुक्यातील जनतेची सुविध हाेणार आहे.