⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

जळगाव जिल्ह्यातून १० हजार कार्यकर्ते, १ हजार चारचाकी दसरा मेळाव्यासाठी जाणार!

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोंबर २०२२ । दसरा मेळावा आमच्यासह लुटण्याची पर्वणी असते, यंदाचा दसरा मेळावा वेगळा राहणार असून, आमच्याकडे शिवतीर्थ नसले तरी बिकेसीच्या मैदानावर बाळासाहेबांचे विचार आम्हाला भेटणार आहे. या दसरा मेळाव्यात आम्ही आमचे शक्तीप्रदर्शन दाखवू, असा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

शिंदे व उद्धव ठाकरे गटात फूट पडल्याने आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील शिवतीर्था ऐवजी बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्यासाठी जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन तालुक्यातून १० हजार कार्यकर्ते व एक हजारहून अधिक चारचाकी गाड्या यंदाच्या ३६ व्या दसरा मेळाव्याला जाणार आहे. अशा पद्धतीने आमची तयारी असल्याचे ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा ५ रोजी मुंबईतील बिकेसी मैदानावर होणार असून, या मेळाव्याच्या नियोजनासाठी अजिंठा विश्रामगृह येथे जळगाव शहर, तालुका व धरणगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या वेळेस पालकमंत्री बोलत होते.

या बैठकीला उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील, गजानन पाटील, संजय पाटील, रवींद्र चव्हाण, माजी जि.प.सदस्य प्रताप पाटील, गोपाळ चौधरी, प्रेमराज पाटील, अनिल पाटील, मुकुंद नन्नवरे, नरेंद्र सोनवणे, राजेंद्र चव्हाण, पवन सोनवणे, जनाअप्पा सोनवणे, नंदलाल पाटील, गोपाळ पाटील, कमलाकर पाटील, रमेश पाटील, तालुका संघटक मुकेश सोनवणे, सरिता कोल्हे, नीलेश पाटील, नगरसेवक दिलीप पोकळे, नगरसेवक मनोज चौधरी, गणेश सोनवणे, आशुतोष पाटील, हर्षल मावळे, शाम कोगटा, नवनाथ दारकुंडे आदी उपस्थित होते.