⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

10वी उत्तीर्णांनो, महाराष्ट्रात सरकारी नोकरी हवीय? 63000 रुपये पगार मिळेल, कसा आणि कुठे कराल अर्ज?

GSI Nagpur Bharti 2022 : तुम्ही जर दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर (Geological Survey of India Ministry of Mines Nagpur) येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (GSI Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2022 असणार आहे.

एकूण जागा : 21

पदाचे नाव : चालक (Driver) –

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांना ड्रायव्हिंग येणं आवश्यक आहे.उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा 3 वर्षांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट : १२ सप्टेंबर २०२२ रोजी २५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

इतका मिळणार पगार :
चालक (Driver) – 19,900/- – 63200/-रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 12 सप्टेंबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त महासंचालक आणि विभाग प्रमुख, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, GSI कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440006 (महाराष्ट्र)

नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी : इथे क्लिक करा.