हनुमान जन्मोत्सवा निमित्त शिरसाळा येथे दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । तब्बल दोन वर्षा नंतर कोरोनाचे निर्बंध हटल्या नंतर यंदा सावदा शहरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शरातील विविध मंदिरात सकाळी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यात गांधी चौकातील मोठा मारोती मंदिराचे सकाळी माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे हस्ते महापूजा झाली. यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी सतिशचंद्र जोशी यांनी महापूजेचे पौरोहित्य केले.
येथील क्रांतीचौकातील नुकत्याच नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या पुरातन असे हनुमान मंदीर, लहान मारोती, स्वामींनारायण नगर मधील हनुमान मंदीर आदी ठिकाणी देखील हनुमान जन्मोत्सव धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. तर येथील स्वामींनारायण मंदिरात सकाळी महारुद्र अभिषेक व होम झाला पोर्णिमे निमित्त राधाकृष्ण भगवान यांचे व हनुमानजी यांचे दर्शाना साठी येथे सावदा व बाहेर गावातील हरिभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान सायंकाळी येथील मारीमात मंदिरा जवळ सायंकाळी परंपरे प्रमाणे यंदा बारागाड्या ओढण्यात आल्या. यावेळी छोटी यात्रा देखील भरली होती बारागाड्या भगत गणेश चौधरी व त्यांचे सोबत असेलेले त्यांचे शिष्य यांनी ओढल्या यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तर भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुक्ताईनगर जवळील शीरसाळा येथील जागृत हनुमान मंदिर तसेच बामणोद ता यावल जवळील सुना सावखेडा येथे देखील हनुमान जन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात होमहवन व धार्मिक कार्यक्रमात संपन्न झाला यावेळी येथे दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती शीरसाळा येथील मंदिरावर सकाळी 4 वाजेपासून नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती तर रात्री उशीरा पर्यन्त नागरिक दर्शनासाठी येत होते एकूणच सर्वत्र हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला