जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । भुसावळ शहरातील समता नगरातील आशिष आलोटकर या तरुणाला डांबून ठेवून मारहाण करणे तसेच कुटुंबाला ओलिस ठेवण्यात आले होते. या प्रकरणी चौघांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांनी या प्रकरणीतील आरोपींना अटक केली, ७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पप्या साळवे, आकाश खिल्लारे, सुमित घनघाव असे संशयित आरोपींचे नाव आहे. यांना अटक केल्यानंतर त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी संशयीतांना न्यायालयात हजर केले असता तीनही संशयीताना ७ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.