जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत असून आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालीय. आज मंगळवारी जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात ४५० रुपयाची घसरण झाली आहे. त्यापूर्वी काल सकाळच्या सत्रात सोने २४ ० रुपयाने तर चांदी ७७० रुपयाने स्वस्त झाली होती.
आजचा सोने-चांदीचा दर? Gold Silver Rate
आज मंगळवारी जळगाव सुवर्ण नगरीत २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,४७० रुपये इतका आहे. तर चांदी ६७,८५० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली होती. युद्धादरम्यान, सोन्याचा भाव ५५६०० रुपयांवर गेला होता. मात्र त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली आहे. मागील तीन आठवड्यात सोन्याचा भाव १४०० ते १५०० रुपयांनी कमी झाला आहे. तर याच कालावधीत चांदी ३००० ते ३२०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
गेल्या आठवड्यातील दर?
जळगावमध्ये २८ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५३,०९० रुपये होते. तर २९ मार्च रोजी ५२,७८०, ३० मार्च रोजी ५२,०००, तर ३१ मार्च ५२,१५०, १ एप्रिल ५२,७९० प्रति तोळा इतका आहे. तर दुसरीकडे २८ मार्च ला चांदी ७०,४५० प्रति किलो होती. २९ मार्च ६९,७००, ३० मार्च ६८,५२०, तर ३१ मार्च ला ६८,९९०, तर १ एप्रिल ला ६९,०७० रुपये प्रति किलो इतका आहे.