⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

श्री पराग गृह उद्योगचे मोबाईल आउटलेट चोपडा तालुक्यातील ग्राहकांच्या सेवेत

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा शहरातील श्री पराग गृह उद्योग यांचे कुटणी यंत्रा द्वारे निर्मित असे सर्व प्रकारचे मसाले,चटणी,हळद,धना पावडर,पापड व उत्कृष्ट दर्जाचे बेसन पीठ विक्री आता ग्राहकांना आपल्या घराजवळच उपलब्ध करून देण्यासाठी धीरकुमार महाजन यांनी आपल्या उद्योगाचे मोबाईल आउटलेट चोपडा शहरातील पंकज नगर स्टॉप याठिकाणी सुरू केले. या वेळी पंकज समूहाचे संचालक पंकज बोरोले यांच्या हस्ते फीत कापून उदघाटन करण्यात आले.

प्रसंगी तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंखे, शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस बी नाना पाटील, प्रगतशील शेतकरी भागवत नाना महाजन, प्रगतशील उद्योजक वामनराव चौधरी,कृषी विभागाचे महेंद्र साळुंखे, डॉ प्रवीण चव्हाण, ॲड कुलदीप पाटील,राहुल पाटील,अनिल बाविस्कर,ललित पाटील,तुषार सुर्यवंशी,शशिकांत पाटील,योगेश दुसाने,संदीप पाटील,विपीन बोरोले,विजय चौधरी, राजेश परमारे,दिपक पाटील,गुलाबराव ठाकरे,आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.