महाराष्ट्रराजकारण
शेतकरी आंदोलनाला मंत्री. गुलाबराव पाटील म्हणाले ‘नौटंकी’
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२३ । पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटते तर्फे बुलढाणा जिल्हाधीकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी नेतेर विकांत तुपकर यांनी , पोलिसांच्या वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पर्यायी पोलिसांनी शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. आणि तुपकरांना ताब्यात घेतले
यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘शेतकऱ्यांचं हे आंदोलन नौटंकी आंदोलन आहे’ आंदोलनाचे अनेक मार्ग आहेत. आपण देखील आंदोलनं केलेली आहेत. मात्र, हे नौटंकी आंदोलन आपल्याला पसंत नाही. असा अतिरेक करणं चुकीचे आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार करणं हे चुकीचं आहे” असे यावेळी पाटील म्हणाले